sant sopankaka maharaj palkhi Malegaon
sakal
माळेगाव - हरित वारी..स्वच्छ वारी..निर्मल वारी, असा संदेश देणारी माळेगाव (ता. बारामती) नगरपंचायत, आकर्षक स्वागत कमानीलगत क्रेनच्या सहाय्याने पालखी रथावर झालेला फुलांचा वर्षाव, दर्शनासाठी स्वतंत्र ठेवलेली विठ्ठल रुक्मीणीची पुर्णाकृती मुर्ती, पालखी स्वागताची केलेली उत्तम व्यवस्था आणि सर्वांचाच आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेले गावातले दुसरे उभे अश्वरिंगण पहाता आज माळेगावात संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत झाले. दुपारच्या वेळी आलेल्या या पालखी सोहळ्याची नगरपंचायत प्रशासनाबरोबर अमित अण्णा तावरे मित्र मंडळाने केलेली स्वागताची तयारी पाहून वारकरी चांगलेच सुखावले.