पुणे - संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २० ते २३ जूनदरम्यान शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहतूक शाखेने विविध उपाययोजना केल्या असून, जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.