पुणे - नियतीने जन्मतः 'त्या' तिघांची 'दृष्टी' हिरावून घेतली, तरी, त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती तसूभरही कमी झालेली नव्हती. त्याच जोरावर तिघांनीही गावाला निरोप देऊन शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली.
वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेताना, एरवी हातात हात घालून, एकमेकांना खंबीर साथ देत बसने फिरणारी ही मित्रमंडळी शुक्रवारी पुण्यातील रस्त्यांवर अगदीच बिनधास्त फिरत होती, त्यांना ना गर्दीची भिती होती, ना वाहनांमुळे अपघात होण्याची.