Ashadi Ekadashi 2025 : भूवैकुंठ पंढरीत वैष्णवांची मांदियाळी; संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांसह सकल संतांच्या पालख्या पंढरीत दाखल

Pandharpur Wari : संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह लाखो वारकरी भक्तिभावाने पंढरपूरात दाखल झाले असून, आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हालेली आहे.
Ashadi Ekadashi 2025
Ashadi Ekadashi 2025Sakal
Updated on

पंढरपूर : टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह सकल संतांच्या पालखी सोहळ्यांसह आलेल्या लाखो वारकऱ्यांनी पंढरीत प्रवेश केला. नाचत, गात आपली वारी विठुरायाच्या चरणी रुजू होणार असल्याने वैष्णवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. पालखी सोहळ्यात विक्रमी संख्येने वारकरी दाखल झाल्याने अवघी पंढरी भक्तिरसात न्हावून निघाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com