
मार्केट यार्ड : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी (ता. २०) आणि शनिवारी (ता. २१) पुण्यात मुक्कामी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात २० ते २५ हजार वारकऱ्यांचा मुक्काम असणार आहे. बाजारातील अडत्यांनी पालखीच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. मुक्काम, जेवणाच्या सोयीसह विविध सुविधांची तयारी केली जात आहे.