पन्नास जणांच्या उपस्थितीत आषाढी पालखी प्रस्थान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tukaram-maharaj

राज्य सरकारकडून श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा देहू येथून12जूनला आणि श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथून13जूनला प्रस्थान सोहळयास दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आली आहे

पन्नास जणांच्या उपस्थितीत आषाढी पालखी प्रस्थान सोहळा

पुणे - श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदिर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून गृह मंत्रालयाने धार्मिक स्थळे आणि पूजा स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊनची घोषणा 30 जूनपर्यंत केली आहे. तसेच, टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करण्यासाठी 'मिशन बिगीन अगेन' बाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार  नागरिकांना धार्मिक स्थळी आणि पूजा स्थळांची ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरवर्षी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने देहू येथून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरला प्रस्थान होते. राज्य सरकारकडून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून 12 जूनला आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथून 13 जूनला प्रस्थान सोहळयास दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आली आहे. देहू आणि आळंदी यांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालखी सोहळा प्रस्थानावेळी  परवानगी दिलेल्या सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या नियमांचे पालन करुन दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थानास मंदिर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी जारी केले.

loading image
go to top