Ashadi Wari 2022 : संकल्प आरोग्याचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadi wari 2022  dnyanwshwar mharaj and Tukaram maharaj palkhi with sakal via saath chal initiative

Ashadi Wari 2022 : संकल्प आरोग्याचा!

पुणे :

हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची,

ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ति असो द्यावे समाधान,

वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते मूळ संचिताचे,

तुका म्हणे घालू तयावरी बार, वाहू हा संसार देवापाशी...

भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेले वारकरी... टाळ-मृदंगांचा गजर... नभोमंडळात घुमणारे अभंग... अशा भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा-तुकोबांचा पालखी सोहळा शुक्रवारी पुण्यनगरीतून मार्गस्थ झाला. या दोन्ही पालख्यांच्या साक्षीने ‘वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची’ असा संदेश देणारा ‘साथ चल’ उपक्रम पुलगेटच्या महात्मा गांधी बस स्थानक येथे पार पडला. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे आरोग्याची जनजागृती करणारा हा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते हास्यक्लबच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतला.

स्वतःबरोबरच कुटुंबाचे अन् देशाचे आरोग्य सर्वार्थाने सुदृढ ठेवण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत ‘साथ चल’ची दिंडी वारीत सहभागी झाली. यावेळी ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ असा जयघोष करत उपस्थितांनी वारीतील अनोख्या खेळांचा आनंद घेतला. टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरला. यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिलांसह पुरुषांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. दोन वर्षांनी वारी होत असल्याने वारीत सहभागी होण्याची प्रत्येकाचीच इच्छा होती. या उपक्रमामुळे वारीत सहभागी होता आल्याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

‘सकाळ’ कायम समाजातील प्रश्नांना घेऊन लोकसहभागातून ते प्रश्न मांडून, सोडून समाजात आपली वृत्तपत्र म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. कोरोनाच्या महामारीतून नुकताच महाराष्ट्र बाहेर पडतोय. या पार्श्वभूमीवर आरोग्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. वारीतून आरोग्याचा संदेश देणाऱ्या या वारीच्या महाराष्ट्र निरोगी करण्याच्या संकल्पनेला शुभेच्छा.

-रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

दगदगीच्या जीवनात नकळतपणे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ‘वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची’मधील ‘साथ चल’ ही संकल्पना खूप छान आहे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ याचे महत्त्व आता समजलेच आहे.

- रफीक शेख, माजी नगरसेवक

उपक्रमात सहभागी संस्था व संघटना

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाला राजकीय, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, कला- संस्कृती, उद्योग, व्यापार, व्यावसायिक आदी विविध क्षेत्रांतून शुक्रवारी मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी आरोग्याचा संदेश देत हा कार्यक्रम झाला.

कॅंप परिसरातील पीएमपीच्या महात्मा गांधी बस स्थानकाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार शरद ढमाले, भाजपचे जालिंदर कामठे, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, माजी नगरसेविका मनीषा लडकत, संदीप लडकत, प्रदीप देशमुख, नवचैतन्य हास्य योग परिवाराचे विठ्ठल काटे, ॲड. एकनाथ सुगावकर, तुळशीबाग व्यापारी संघटनेचे दुर्गेश नवले, मल्ल्येश कांबळे आदी उपस्थित होते.

महेंद्र गणपुले, सुजित जगताप, विठ्ठल शिंदे, वृंदा हजारे, शिवाजी खांडेकर, प्रसन्न कोतुळकर, डॉ. मनोज तारांबळे, डॉ. मनमोहन भुमकर, डॉ. प्रसन्न शेटे, प्रा. अर्चना मिराशी, डॉ. अंजली वाघमारे, प्रा. राजीव सिंग, अतिया शेख, तसेच सोनल दळवी, डॉ. सुनील जगताप, मुश्ताक पटेल, आबा बाबर, अशोक साळेकर, संतोष चोरडिया या उपक्रमात सहभागी झाले होते.

तसेच सोहनी डांगे, अनिता जैन, नीता पाटोळे, सुवर्णा भरेकर, विद्या चव्हाण, विद्या सकट, उषा केंचनगुड, शोभा तांबे, मधू हाथीरामाणी, यास्मीन मोहोळकर, गीताबाई बिडकर, एम. डी. फॅरॉव, अर्जुन बिडकर, रेखा शहा, जोत्स्ना सुबंध, सुरेंद्र जाधव, अशोक पिल्ले, शिवम्मा पंजाबी, प्रेमा धुमावत, चेतन यादव, सागर परदेशी, रणवीर अरगडे, संतोष यादव, नितीन बुरेवार, सुरेंद्र शिंदे, शिरीष आगुरेड्डी, अमित सार्थे, सचिन दोडके, सागर गोरे, अमित चव्हाण, रविकांत मुळे, प्रशांत भोईड, गणेश मुळे, आनंद निंबाळकर, नितीन अरगडे, किरण निघोचकर, पारस निघोचकर, अथर्व निंबाळकर, अजय भोईड, विकास भांबुरे, विजय भोसले, अशोक देशमुख, प्रकाश अरगडे, मोहन नारायणे, रवींद्र जावळे, भारती अंकलेल्लू, आय. टी. शेख, नीलेश कणसे, अजय ओसवाल, डॉ. बंटी धर्मा, रोहित कांबळे, प्रवीण गाडे, मोहित शहा, डॉ. रेखा कांबळे, श्वेता दोषी, स्मिता खंते, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी, नीता भोसले, राजेंद्र भिंताडे, उत्तम फुलावरे, गणेश कानडे, विशाल कामठे, चंद्रकांत काळे, विनोद सपकाळ, अतुल कोठारे, राजेंद्र धावडे, राजेंद्र कुंभारकर, रोहिदास एकाड, योगेंद्र गायकवाड, डॉ. अनिल पाटील, करण भानगिरे, प्रा. शोभा लगड, महेश सातव, संजय हरपळे, हिरालाल पाटील, तुषार पवार, रामविलास माहेश्वरी, महेश पुंडे, दिनेश होले, कादंबरी राजोरे, प्रमोद अडकर, शीला मोरे, हर्षल क्षीरसागर, मेजर बी. जी. पाचरणे (निवृत्त), कॅप्टन संभाजी पुंड (निवृत्त), अमेय पवार, विकास माने, डॉ. राजेंद्र खेडेकर आदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

जो चाली वारी, त्याला विठ्ठल तारी

कोरोना उद्रेकात आरोग्याचे महत्त्व आपल्या सर्वांनी फारच जवळून अनुभवले आहे. त्यामुळे चालण्याचे महत्त्व आता आपल्याला कळाले आहे. ‘जो चाली वारी, त्याला विठ्ठल तारी’ असे म्हणत स्वतःच्या आरोग्यासाठी चालण्याचा संदेश या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी दिला.

Web Title: Ashadi Wari 2022 Dnyanwshwar Mharaj And Tukaram Maharaj Palkhi With Sakal Via Saath Chal Initiative

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..