

BAR26B13132
आश्लेषा ढेंबरे
आश्लेषा ढेंबरेची सैनिकी स्कूलसाठी निवड
........
बार्शी शहर : येथील आश्लेषा बाळासाहेब ढेंबरे हिने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. तिला ३०० पैकी २७८ गुण मिळाले. तिने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले आहे. तिने राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेत मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. आश्लेषाच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
........
नवीन मराठी शाळेत आनंद बाजार उत्साहात
बार्शी शहर : येथील नवीन मराठी शाळेत आनंद बाजार हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या आनंद बाजारातून सुमारे ७० हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून खाऊ गल्ली, फळे, भाजीपाला आदी वस्तूंची विक्री केली. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भारत बावकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुलाखे हायस्कूलचे प्राचार्य रामकृष्ण इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसन्न देशपांडे, प्रमुख पाहुणे राजश्री पाटील, व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्रीमती गोसावी, श्री. मुंडे, उपाध्यक्ष श्री. देशपांडे, पर्यवेक्षक सुरेश शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण वाघमारे यांनी केले. ज्ञानेश्वर खुने, बाळासाहेब ढेंबरे, उमेश नाईकवाडी, तुकाराम अगावणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.