आसू - प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या गाव पांढरीच्या वैभवखुणा ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार

आसू - प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या गाव पांढरीच्या वैभवखुणा ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार

Published on

प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या
ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार

आसू, ता. २४ : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागातील प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ग्रंथास शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ललितेत्तर साहित्य पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ (शिविम), कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र व शिविमचे १५ वे अधिवेशन नुकतेच सातारा येथे झाले. या अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे मराठी अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, शिविमचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, प्रा. डॉ. रफिक सूरज, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल प्रा. डॉ. शिंदे यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सचिव संजीवराजे नाईक- निंबाळकर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम आदींनी अभिनंदन केले आहे.

फोटो
02541
सातारा : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. अशोक शिंदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com