

नसरापूर, ता. १८ : भोर तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावचे पोलिस पाटील अशोक साधू येनपुरे (वय ५०) यांच्या खूनप्रकरणी राजगड पोलिसांनी तातडीने तपास करत संशय व्यक्त केलेल्या तीनही आरोपींना घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रात्री ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
प्रतीक रामदास शेजवळ (वय २२, रा. सांगवी बुद्रुक), प्रज्वल उर्फ प्रशांत संतोष गोगावले (वय १८ वर्ष ३ महिने, रा. गोगलवाडी, ता. हवेली) व प्रणव कैलास गोगावले (वय १९, रा. गोगलवाडी) या तिघांना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगवीचे पोलिस पाटील अशोक येनपुरे यांचा सोमवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांचा मुलगा शुभम यांनी फिर्याद देताना त्यांचाच जवळचा नातेवाईक प्रतीक शेजवळ व इतर दोन जणांवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले व सहकाऱ्यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तीनही आरोपींना ताब्यात घेतले.
तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा उद्देश, वापरलेले हत्यार जप्त करण्यासह अधिक तपास करण्यासाठी तपास अधिकारी चेतन मछले यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.