फुलवडेत गवत, झुडपांची नियमित साफसफाई

फुलवडेत गवत, झुडपांची नियमित साफसफाई
Published on

फुलवडे, ता. १३ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथे नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील
वसतिगृहातील प्रकाश व्यवस्था, दरवाजे-खिडक्या आदींची नियमित पाहणी केली जाते. जंगली श्वापदे तसेच साप आश्रमशाळेत येऊ नये यासाठी वसतिगृहाभोवती वाढलेले गवत, झुडपांची नियमित साफसफाई होते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आश्रमशाळेच्या इमारतीच्या भिंती, फरशी, छत, खिडक्या व दरवाजे आदींची वेळोवेळी दुरुस्ती केली जाते. दुर्गम भागात असून आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. यामध्ये एकूण १८९ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या शेजारी घनदाट झाडी नाही. आजूबाजूला शेती आहे.

निवासी विद्यार्थी
१०३....... मुले
८६....... मुली

दृष्टिक्षेपातील सुविधा
- प्राथमिक उपचार किंवा आरोग्यविषयक सुविधा
- प्राथमिक उपचार पेटी, आवश्यक औषधे उपलब्ध
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था

शाळेजवळच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
शाळेच्या इमारतीपासून वसतिगृह, भोजनगृह, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि परिसरातील स्वच्छता या सर्व बाबींची नियमित तपासणी केली जाते. शाळेच्या जवळच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.

शाळेची व वसतिगृहाची इमारत दुमजली असून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी झोपण्याची व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात आली असून सर्वांना झोपण्यासाठी गाद्यांची व्यवस्था केलेली आहे.
- सोपान फटांगरे, प्राथमिक मुख्याध्यापक.

आश्रमशाळेतील मुले ही स्वतःची मुले आहेत असे समजून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.
- सचिन म्हस्के, माध्यमिक शिक्षक

आश्रमशाळेत सुरक्षिततेबाबत सर्व उपाययोजना उपलब्ध असून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आमची वेळोवेळी विचारपूस करून आमची काळजी घेतात.
- गौरी मोहंडूळे, विद्यार्थिनी.

आश्रमशाळेत मुले व मुली यांचे स्वतंत्र वसतीगृह व शालेय इमारत सुस्थितीत असून संरक्षक भिंत असल्याने आमच्या विद्यार्थ्यांना चांगले संरक्षण मिळत आहे.
- अरुण पारधी, पालक, पाटण

05510

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com