अष्टविनायक दर्शन व पूजन बातमी

अष्टविनायक दर्शन व पूजन बातमी
Published on

फोटोओळी :
PNE26W46196
सोलापूर : श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील धुळी महांकाळ गणपतीची आरती करताना शिवयोगी शास्त्री होळीमठ व भाविक.
PNE26W46197
सोलापूर : भाविकांना फराळाचे वाटप करताना श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर समितीचे कार्यकर्ते.
PNE26W46198
सोलापूर : अष्टविनायक यात्रेत सहभागी महिला भाविक.

दहा तासांचा ८० किलोमीटरचा प्रवास; २०० भक्तांची अष्टविनायक यात्रा
आठ दिशांना सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या गणपतींचे पूजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३१ : तिसऱ्या श्रावण सोमवारी चतुर्थीचा योग साधत श्री अष्टविनायक भक्त मंडळाच्या २०० हून अधिक भक्तांनी तब्बल दहा तासांत सुमारे ८० किलोमीटरचा प्रवास करीत आठ दिशांना श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांचे पूजन केले. कुंभारी येथील वीर गणपतीपासून सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली ही यात्रा रात्री नऊ वाजता शिवानुभव मंगल कार्यालयातील कामेश्वर अतिथी गणपतीच्या पूजनाने पूर्ण झाली.
कुंभारी येथील वीर गणपतीचे शास्त्रोक्त मंत्रोच्चारात पूजन करून व दिवा लावून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर होटगी येथील बेनक गणपती (पाठीराखा गणपती), श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील धुळी महांकाळ गणपती, देगाव लमाण तांडा येथील करीगण गणपती (काळ्या सोंडेचा गणपती), सम्राट चौकातील विरकर गणपती, बाणेगाव येथील वीर कोलाहल गणपती, तळे हिप्परगा येथील मश्रुम गणपती आणि अखेरीस कामेश्वर अतिथी गणपतीचे पूजन करण्यात आले. प्रत्येक गणपतीला शेंदूर लावून टॉवेल व टोपी घालण्यात आली. बेल, दूर्वा व फुले वाहून आरती करण्यात आली.
--------------------
रेवणसिद्धेश्वर मंदिर समितीतर्फे फराळ वाटप
श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील धुळी महांकाळ गणपतीचे पूजन व आरती झाल्यानंतर उपस्थित २०० भक्तांना शाबूचिवडा, शेंगा लाडू, खिचडी, मोदक व पेढे असा प्रसाद देण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी यंदा एक बस व तीन क्रुझर गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
--------------------
कोट
PNE26W46200
पूर्वेला वीरेश, आग्नेयेला बेनक, दक्षिणेला धुळी महांकाळ, नैऋत्येला करी, पश्चिमेला वीरकर, वायव्येला वीर-कोलाहल, ईशान्येला मश्रुम आणि उत्तरेला शेळगी गणपती किंवा अष्टविनायक कामेश्वर गणपतींची स्थापना श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी केली आहे. सोलापूरसह भक्तांचे विपत्तीपासून रक्षण व्हावे, यासाठी या गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या ४५ वर्षांपासून मला या गणपतींचे पूजन करण्याचे भाग्य लाभत आहे.
- शिवयोगी शास्त्री होळीमठ, वेदमूर्ती
--------------------------
कोट
PNE26W46199
सुरुवातीला सायकलवरून ही यात्रा होत होती. त्यानंतर दुचाकीचा वापर करण्यात आला. यंदा भक्तांच्या सोयीसाठी एक बस व तीन क्रुझरची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ११.३० वाजता सुरू झालेले अष्टविनायक पूजन रात्री नऊ वाजता शेवटच्या अतिथी गणपतीच्या पूजनाने पूर्ण झाले.
- सिद्धय्या स्वामी, मार्गदर्शक, अष्टविनायक भक्त मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com