आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्याच्या ११७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रकियेला सुरवात

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्याच्या ११७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रकियेला सुरवात
Published on

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ११७ कोटींची निविदा प्रक्रिया सुरू
मोहोळ तालुक्यातील सिंचन प्रकल्पाला गती; राजन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

अनगर, ता. ७ : मोहोळ मतदारसंघातील आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ११७ कोटींच्या विविध कामांच्या निविदा प्रक्रियेला शासनाने प्रारंभ केला आहे. या प्रक्रियेमुळे मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाच्या उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून, माजी आमदार राजन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

या योजनेमुळे मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. राजन पाटील यांनी या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी वेळोवेळी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे केली होती. शासनाने त्याची दखल घेत निविदा प्रक्रियेला मंजुरी दिल्याने योजनेच्या पूर्णत्वाला गती मिळणार आहे.

कोट
- आष्टी उपसा सिंचन योजनेच्या यापूर्वीच्या टप्प्यांच्या पूर्णत्वासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजितदादा आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतली. तिसऱ्या टप्प्याच्या निविदा प्रक्रियेलाही त्यांनी सहकार्य केले. यापुढेही मोहोळ मतदारसंघातील उपेक्षित भागाला हक्काचे पाणी मिळावे आणि सीना-भोगावती जोड प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.
- राजन पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद

प्रामुख्याने ही कामे
उजनी कालवा विभाग क्रमांक ९, मंगळवेढा कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेमध्ये पंपगृह, उर्ध्वगामी नलिका, वितरण कुंड यांची स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत कामे, बंदिस्त नलिका वितरण प्रणाली उभारणे, पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन क्षेत्र हस्तांतरित करणे, पाच वर्षांची देखभाल-दुरुस्ती तसेच आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक १ मधील डावा व उजवा कालवा अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com