Dagdusheth Ganpati : संत ज्ञानेश्वर पालखीतील अश्वराजांनी दगडूशेठ गणपती मंदिरात थेट प्रवेश करून अनोखी मानवंदना दिली. शितोळे घराण्याचे अश्व वंदनासाठी आले असून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले.