

Digital Audio Guide' facility at 18 historic monuments including Visapur Fort.
Sakal
किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना किंवा लेण्यांमधील शिल्पे न्याहाळताना आता पर्यटकांना आपल्या मोबाइलच्या हेडसेटमधून त्या वास्तूंचा प्रमाणित इतिहास ऐकता येणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे (ASI) राज्यातील विसापूर किल्ल्यासह तब्बल १८ नवीन ऐतिहासिक वास्तूंवर ‘डिजिटल हेरिटेज ऑडिओ गाइड’ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.