

Pune
esakal
संतोष आटोळे,
इंदापूर: इंदापूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते व सामाजिक कार्यकर्ते अनिल सुदाम पवार यांच्यावर नगरपालिकेतील बैठक आटोपून बाहेर पडत असताना गुरुवार (ता.02) रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात तेजस सुर्यवंशी, सुरज गोसावी, बाब्या उर्फ ओंकार राऊत, चिन्मय कुलकर्णी, स्वप्नील जबडे, यश बनसोडे तसेच दोन अनोळखी असे एकूण आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.