
सोमेश्वरनगर - राजस्थानहून फर्निचरची कामे करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा रविवारी (ता. १२) वाणेवाडी (ता. बारामती) येथे झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाला. भरधाव ट्रॅक्टरमध्ये बसलेला तो युवक खाली पडला आणि ट्रॅक्टरलाच जोडलेल्या दोन ट्रॉलीची चाके अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सांगसिंह दीपसिंह सिंह (वय १७ हल्ली रा. करंजेपूल, ता. बारामती तर मूळ रा. पद्रोडा, ता. भनियाना, जि. जैसलमेर) असे मयत झाल्याचे नाव आहे.