आश्लेषा बागडे मंगळवेढा केसरीची मानकरी
KTR26B09199
मंगळवेढा : राज्यस्तरीय मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर पैलवान आश्लेषा बागडेचा सन्मान करताना पैलवान व मार्गदर्शक.
.......
राज्यस्तरीय मंगळवेढा केसरीची
आश्लेषा बागडे ठरली मानकरी
......
सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. २७ : मंगळवेढा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू आश्लेषा कल्याण बागडे हिने दमदार कामगिरी करत महिला मंगळवेढा केसरी होण्याचा मान पटकावला. या चुरशीच्या कुस्ती स्पर्धेत करमाळा तालुक्यातील आश्लेषा बागडे हिने प्रथमच महिला मंगळवेढा केसरी किताब जिंकून इतिहास घडवला. अंतिम कुस्तीमध्ये आश्लेषाने कोल्हापूरच्या नामांकित कुस्तीपटू रिंकू पाटील हिला पराभूत करत निर्णायक विजय मिळवला. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या विजयाचे स्वागत केले. या विजयामुळे करमाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आश्लेषा ही सध्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे बी. ए. अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे सचिव विलासराव घुमरे, प्राचार्य माने, क्रीडा मार्गदर्शक राम काळे आदींनी तिचा सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

