अंध व दुर्बल मतदारांना मतदानासाठी

अंध व दुर्बल मतदारांना मतदानासाठी
Published on: 

अंध, दुर्बलांना मतदानासाठी मिळेल मदतनीस

शिक्षक, पदवीधर निवडणूक; केंद्राध्यक्षांकडे राहणार नोंदी
----
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : अंध किंवा दुर्बल मतदारांना मतदानासाठी मदतनीस आवश्यक असल्यास मतदाराने मतदानाच्या दिवसापूर्वी किमान तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे आवश्यक आहे. अशा मतदारांची पात्रता तपासल्यानंतर त्यांच्या नावासमोर मतदार यादीत नियमानुसार नोंद केली जाणार आहे. अशा नोंद केलेल्या मतदारांची माहिती संबंधित मतदान केंद्रांना पुरविली जाणार आहे, त्यामुळे पात्र मतदारांना नियमानुसार सुविधा मिळणार आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी प्रशासनाने ही माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या संदर्भातील सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मदतनीसाला मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार नाही मात्र, अंध किंवा दुर्बल मतदारांच्या बाबतीत निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील नियम ४०-अ व नियम ७० अंतर्गत असलेली तरतूद लागू राहील. संबंधित मतदाराची पात्रता तपासून विहित नियमानुसारच साथीदाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान करण्यापूर्वी अंध किंवा दुर्बल मतदाराने विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षा नमुना १४-अ मध्ये नियमानुसार नोंदवही ठेवणार आहेत. मतदानानंतर हा नमुना संकलित करून त्याची छाननी करण्यासाठी निवडणूक निरीक्षकांकडे उपलब्ध करून दिला जाणार आहे. द्यावा. नमुना १४-अ पूर्णपणे भरलेला व स्वाक्षरी केलेला असल्याची खात्री करून तो इतर निवडणूक साहित्यांसह विहित वेळेत जमा करावा लागणार आहे.
----
अनियमितता झाल्यास जबाबदारी निश्‍चित
निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करून अंध व दुर्बल मतदारांना नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com