esakal | कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Assistant police inspector dies due to corona in pune

भगवान रामचंद्र निकम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. निकम हे पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत नेमणुकीस होते. ते कुटुंबासह विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांना मधुमेह व मणक्याचा त्रास होता.

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील एका सहायक पोलिस निरीक्षकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे सोमवारी रात्री आठ वाजता मृत्यू झाला. शहर पोलिस दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्या सहावर गेली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भगवान रामचंद्र निकम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. निकम हे पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत नेमणुकीस होते. ते कुटुंबासह विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांना मधुमेह व मणक्याचा त्रास होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१२ सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुन्हा कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या तीन दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास सुरु होता, त्यामुळे  त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

loading image