कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहित धरून पुण्यात महापालिकेने तयारी करावी

Assuming the possibility of another wave of corona the PMC should prepare
Assuming the possibility of another wave of corona the PMC should prepare

पुणे : पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नियोजनाचा आराखडा तयार करून तयारी करून ठेवावी, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे शनिवारी एका पत्राद्वारे केली. बंद केलेली कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याचीही तयारी महापालिकेने करून डॉक्‍टर, परिचारिका व संबंधित कर्मचाऱ्यांची तजवीज करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात खासदार चव्हाण यांनी म्हटले आहे की, देशाच्या अनेक भागांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिल्लीमध्ये मर्यादीत प्रमाणात लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. तर, मुंबई - ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील महापालिकांनी घेतला आहे. पुण्यातील परिस्थितीही झपाट्याने बदलत आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरात रोज सरासरी 210 रुग्ण सापडत होते. मात्र 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान रोज सरासरी 140 रुग्णांची नोंद झाली. परंतु, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अनुक्रमे 384, 411 आणि 373 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कमी झालेली रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेला आता पुन्हा उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोविड केअर सेंटर्स टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच महापालिकेच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनीही त्यांच्याकडील कोविड वॉर्ड बंद केले आहेत. महापालिकेने अधिग्रहीत केलेली रुग्णालयेही पुन्हा खुली झाली आहेत. परंतु, कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत राहिली तर ऐनवेळी प्रशासनाची धावपळ होण्याची शक्‍यता आहे. तसेच डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य संबंधित कर्मचारी यांची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा आदींचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने आत्तापासूनच समग्र नियोजन करावे. त्यासाठी आराखडा तयार करावा आणि तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ नये आणि लॉकडाऊनसारख्या उपायांना कोणालाही सामोरे जावे लागू नये, अशीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. त्यासाठी महापालिकेने आत्तापासूनच आराखडा तयार करून अंमलबजावणीची दिशा निश्‍चित करण्याची गरज आहे. त्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करून पुणेकरांना आश्‍वस्त करावे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिका प्रशासनाला सहकार्य करेल, असेही खासदार चव्हाण यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com