

कोळवणमध्ये महामानवाला आरोग्य सेवेतून अभिवादन! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ९५ नागरिकांची मोफत तपासणी; रक्तदान शिबिरासही प्रतिसाद
Sakal
पांडुरंग साठे
कोळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोळवण परिसरातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन आस्था मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पिरंगुट व विशाल उत्तम बर्वे यांच्या वतीने शनिवार ता.१८ रोजी करण्यात आले होते.