Atharv Pawar
sakal
बारामती - जिद्द, सातत्य आणि योग्य दिशेने केलेल्या मेहनतीला यशाची साथ मिळाली की मोठे स्वप्नही प्रत्यक्षात उतरते, याचा प्रत्यय बारामतीतील अथर्व प्रदीप पवार यांच्या यशातून आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील सहायक कमांडंट (वर्ग-१) पदासाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अथर्व यांनी अखिल भारतीय स्तरावर 32 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.