
#AtHomeWithSakal या स्पर्धेत स्त्रीयांसाठी आजचं चॅलेंज घेऊन आली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
पुणे: आपण पाहतोय की सध्या कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. आपल्या देशातही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घरात कंटाळले आहेत.
त्यामुळे साहजिकंच घरी बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडलाय की घरात बसून नेमकं करावं तरी काय? पण डोन्ट वरी तुमच्या या सेल्फ क्वारंटाईन काळामध्ये सकाळ माध्यम समुह तुमच्यासोबत आहे..बरं आता विचार करत असाल सोबत म्हणजे नेमका कसा? तर हो आम्ही आता दररोज तुमच्यासोबत असणार आहोत..विचार करा जर तुम्हाला या काळात घर बसल्या बक्षिसं मिळणार असं सांगितलं तर तुम्ही काय कराल? बरोबर अगदी तेच करायचं आहे. कारण आम्ही कुटुंबातल्या प्रत्येकाचा कंटाळा घालवण्यासाठी घेऊन आलो आहोत सकाळची अनोखी स्पर्धा ज्याचं नाव आहे #AtHomeWithSakal.
#AtHomeWithSakal या स्पर्धेत स्त्रीयांसाठी आजचं चॅलेंज घेऊन आली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
स्त्रीयांना सगळ्यात जास्त काय करायला आवडतं ? अगदी बरोबर ड्रेसअप व्हायला, नटायला आवडतं आणि खूपं सारे सेल्फी आणि व्हिडिओज काढायला आवडतात. म्हणूनंच क्वारंटाईन टाईममध्ये महिलांना करायचा आहे घरबसल्या फॅशन शो. तेव्हा येत्या ७ दिवसात आम्ही तुम्हाला दररोज एक थीम देणार आहोत. तुम्ही या थीमप्रमाणे ड्रेसअप व्हायचं आहे. त्या ड्रेसमध्ये मस्त कॅटवॉक करायचा. मस्त पोझ द्यायची आणि एक छान व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवायचा आहे. हा व्हिडिओ आम्हाला टॅग करा आणि #AtHomeWithSakal वापरुन शेअर करा. लवकरात लवकरत या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण विजेत्यांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसं.
काय मग आजच्या थीमसाठी तयार आहात ना..?आजची थीम आहे 'व्हाईट'.. या थीमप्रमाणे तुम्ही आज तुमच्या आवडीचा व्हाईट अर्थात पांढ-या रंगाचा पोशाख घालून कोणत्याही प्रकारची फॅशन करायची आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. चला तर मग आता आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो आहे...पुन्हा भेटूच.