कोपरगाव ः- रोल बाॅल स्पर्धेत आत्मा मालिकची बाजी

कोपरगाव ः- रोल बाॅल स्पर्धेत आत्मा मालिकची बाजी
Published on: 

SHD26B06163
कोकमठाण (ता.कोपरगाव) ः रोलबाॅल स्पर्धेत विजेते आत्मा मालिकच्या दोन्ही संघ.
------------------

रोलबाॅल स्पर्धेत ‘आत्मा मालिक’ची बाजी
संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड ः खेळाडूंचा शाळेतर्फे सत्कार

कोपरगाव, ता. १५ ः शालेय रोलबाॅल स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटाकाविले. या संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. विजेत्या खेळाडूंचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर येथील सेंट झेवियर्स स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या आयोजनातून ही शालेय रोलबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला त्यात आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व १९ वर्षाखालील मुलांच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले.
आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल विभागातर्फे १४ मुलींचा एक संघ, तसेच १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांचे प्रत्येकी एक संघ सहभागी झाले होते. इंग्लिश मीडियम विभागातून १७ वर्षाखालील एक संघ, तर मराठी माध्यम विभागातून १४ वर्षाखालील दोन संघ आणि १७ वर्षाखालील एक संघ स्पर्धेत सहभागी झाला होता.

१४ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय व इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. क्रीडा प्रशिक्षक दत्तात्रेय भोसले यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्‍वस्त मंडळातील सदस्य, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, नामदेव डांगे, नितीन सोनवणे, अशोक शिंदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
----------------
विद्यार्थ्यांच्या यशामुळे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्राचा उत्साह वाढविणारी ही कामगिरी आहे. विभागीय स्पर्धेतही विजेते संघ उत्तम कामगिरी करतील.
-नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com