कोपरगाव ः- आत्मा मालिक च्या खेळाडूंची सर्वोत्तम कामगीरी...

कोपरगाव ः- आत्मा मालिक च्या खेळाडूंची सर्वोत्तम कामगीरी...
Published on: 

SHD26B06256
कोकमठाण (ता. कोपरगाव) ः विभागीय मैदानी स्पर्धेत आत्मा मालिकच्या खेळाडूंनी यश संपादन केले.
---------------------

‘आत्मा मालिक’च्या खेळाडूंना तेरा पदके
विभागीय मैदानी स्पर्धा गाजविली ः २२ खेळाडू सहभागी
कोपरगाव, ता. ५ ः पिंपरी-चिंचवड येथे आयोजित शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी गाजविली. या स्पर्धेत तेरा पदकांची कामगिरी केली.
या स्पर्धेत विद्यालयाचे १६ मुले व ६ मुली, असे २२ खेळाडू सहभागी झाले होते. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात किशोर पावरने ११० मीटर हर्डल्स स्पर्धेत १६.५ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकाविले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. प्रफुल्ल वसावे याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४ मिनिटे ३५ सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक मिळवले.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात ४०० मीटर रिले स्पर्धेत सचिन वराठा, विपुल वळवी, रोहन कोंब, विवेक चौधरी व यशराज चव्हाण यांच्या संघाने ३ मिनिटे ३८ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकाविले, तर १०० मीटर रिले स्पर्धेत सचिन वराठा, प्रतीक ठिंगळे, रोहन कोंब, विवेक चौधरी व आकाश ठाकरे यांच्या संघाने ४५ सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक मिळवले.
या यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक अजित पवार, दीपाली येनपुरे, अण्णासाहेब गोपाल व अजय खरात यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्‍वस्त मंडळातील सदस्य, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल, प्राचार्य माणिक जाधव, मीनाक्षी काकडे व नामदेव डांगे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.
---------------
विभागीय स्पर्धेत कामगिरी
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात पटले पूनम अमाशा हिने बांबू उडी प्रकारात रौप्यपदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्थान निश्‍चित केले. विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर किशोर पावरा (११० मीटर हर्डल्स) आणि पूनम पटले (बांबू उडी) या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.