मदतीसाठी बोलाविण्याचा बहाणा करुन सांगलीतील तरूणीवर तरुणाकडून बलात्कार 

पांडुरंग सरोदे
Wednesday, 6 January 2021

तरुणीचा व्हिडीओ व्हायरल करीत खंडणी उकळण्याचाही प्रकार घडला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : हाताचे ऑपरेशन झाल्याचे सांगत गावाहून मदतीसाठी बोलाविलेल्या तरूणीवर ओळखीच्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचा व्हिडीओ व्हायरल करीत खंडणी उकळण्याचाही प्रकार घडला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रोहन सुरेद्रनाथ आवळे (रा. आयोध्या चित्रपटगृहामागे, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांगली येथील 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आवळे याने त्याच्या हाताचे ऑपरेशन झाले आहे, असे सांगून मदतीसाठी फिर्यादी तरुणीला एप्रिल 2018 मध्ये पुण्यात बोलावले. त्यानंतर तरूणीला त्याच्या मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

त्यावेळी त्याने संबंधीत घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तसेच तरुणीला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

तसेच तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीने याप्रकरणी सांगली येथील संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा सिंहगड पोलिसांकडे शुन्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला आहे.  

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atrocities on a young girl in pune