पुण्यात पब्जीसाठी मित्रावर केला कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुणे : पब्जी गेमच्या आहारी गेल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शहरात पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मागील रविवारी हडपसर येथील लोखंडी पुलाजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली. 

सुनील माने (वय 19, रा. शिंगोट प्लाझा, हडपसर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हेमंतसिंग रजपुत (वय 24, रा. महम्मदवाडी) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन हडपसर पोलिसांनी सनी पांडुरंग लोंढे (वय 18), करण वानखेडे (वय 22, रा.डवरीनगर, लोखंडी पुलाजवळ, हडपसर) यांना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील रविवारी सायंकाळी सहा वाजता फिर्यादी व आरोपी लोखंडीपुलाजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी सनी लोंढे याने पब्जी गेम खेळण्यासाठी फिर्यादी रजपुत याच्याकडील मोबाईल मागितला. त्यावेळी फिर्यादीचा मित्र सुनील माने (वय 19, रा. शिंगोट प्लाझा, हडपसर) याने सनी लोंढे यास मोबाईल देत नाही, असे सांगितले. त्यामुळे सनी व सुनील या दोघांमध्ये बाचाबाची होऊन भांडणे सुरू झाली. त्या कारणावरुन सनीचा मित्र करण वानखेडे याने सुनील माने यास आता सोडायचे नाही, त्यास जीवे मारायचे असे म्हणत त्याच्याजवळील कोयता काढून सुनील माने याच्या डोक्‍यात घातला. लोंढे व वानखेडे यांनी त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माने गंभीर जखमी झाल्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर फिर्यादी व स्थानिक नागरीकांच्या मदतीने सुनीलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on friend by sharp weapon for pubg game