पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या चाकूने केेले वार

crime.jpg
crime.jpg

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर गप्पा मारणाऱ्या दोघांनी आपल्याला उद्देशून बोलल्याचे कारण पुढे करून सायकलस्वाराने त्यांच्याबरोबर भांडणे केली. त्यानंतर त्यांच्या मदतीला आलेल्या अन्य दोघांसह चौघांना सायकलस्वाराने चावीच्या किचेनला असलेल्या छोट्या चाकूने मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. 

पिंपरीत किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

चेतन येडल्लु असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शाहरूख शेख (वय 23, रा. दापोडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका अनोळखी सायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरेरे! चक्क ‘स्मार्ट’ शाळेतील विद्यार्थी अनवाणी

पोलिस उपनिरीक्षक आर.व्ही.माळेगावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरूख हा त्याच्या एका सहकारी तरुणीसोबत विद्यापीठाच्या मैदानामध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका सायकलस्वारास फिर्यादी व त्यांच्या सहकारी मैत्रीणीने त्यास उद्देशून काहीतरी बोलले, असा गैरसमज झाला. त्यामुळे त्याने येऊन दोघांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली.
 

बोरघाट जानेवारीपर्यंत सुरक्षित; दुरुस्ती वेगात 

दरम्यान, फिर्यादीने त्याचा भाऊ अजहर शेख व त्याचा मित्र चेतन येडल्लू यास बोलावून घेतले. ते आल्यानंतर चौघेजण सायकलस्वारासमवेत भांडू लागले. त्यावेळी सायकलस्वाराने त्यांना शिवीगाळ करु मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील चावीच्या किचेनला असलेल्या छोट्या चाकूने त्यांच्यावर वार केले. त्यामध्ये चौघेजण किरकोळ जखमी झाले. त्यात येडल्लू हा अधिक जखमी झाला. दरम्यान, या प्रकराबाबत पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने चतुःश्रृंगी पोलिस तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com