
सोमेश्वरनगर : नीरानजीक थोपटेवाडी (ता. पुरंदर) येथील पारधी समाजाच्या कुटुंबावर पंधरा जणांच्या जमावाकडून आठवड्यापूर्वी हल्ला करण्यात आला होता. यातील दोघे अजूनही गंभीर जखमी आहेत तर पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन अविवाहीत मुलींशी गंभीर गैरवर्तनही झालेले आहे. मात्र, आठवडा उलटल्यावरही जेजुरी पोलिसांतर्गत नीरा दूरक्षेत्राने कल्पना असताना किरकोळ दखलसुध्दा घेतलेली नाही. उलट पारधी कुटुंबालाच आत टाकण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे हल्लेखोरांची फिर्याद मात्र पोलिसांनी तत्परतेने घेतली आहे.