बारामती : राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांच्या पतीवर हल्ला; पोलिस अॅक्शन मोडमध्ये

ncp
ncpsakal media

माळेगाव ः  माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर सोमवार (ता. ३१) रोजी राजकिय वैमनस्यातून पिस्तूलाद्वारे खूनी हल्ला करण्यात आला होता. त्या प्रकरणी तालुका पोलिसांनी आज तीन सराईत आरोपींसह एका अनोळखी युवकाविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांन्यवे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जखमी रविराज यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसात फिर्य़ादी दिली.

ncp
पुणे व पिंपरी-चिंचवडला काय सुरू अन् काय बंद?

राजकीय व आर्थिक फायदा मिळविणे, तसेच माळेगावात दहशत माजविण्याच्या उद्देशाने प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, आकाश प्रशांत मोरे ( सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती ) यांच्यासह एक अनोळखी युवकाने पिस्तूलाद्वारे गोळी मारून माझ्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार सौ. तावरे यांनी फिर्य़ादीत नमूद केली. त्यानुसार पोलिसांनी आज आरोपी प्रशांत मोरे, टाॅम उर्फ विनोद मोरे, आकाश मोरे यांच्यासह एक अनोळखी युवकावर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिली.

दरम्यान, माळेगाव- संभाजीनगर येथे सोमवारी सायंकाळच्यावेळी वडापाव आणण्यासाठी जखमी रविराज व त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे या फोरव्हिलरद्वारे गेल्या होत्या. अर्थात याचा फायदा घेत आरोपी आकाश मोरे व त्याच्या सहाकाऱ्यांनी बुलट मोटारसायकद्वारे येऊन रविराज यांच्या छातीत पिस्तूलाद्वारे गोळी झाडली व जखमी केले होते. घटनेचे गार्भिय विचारात घेत खुद्द पोलिस अधिक्षक अभिनव देखमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मलिंद मोहिते, उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळाला भेट दिली व आरोपींना अटक करीत त्यांच्या मुस्क्या आवळल्या.

ncp
पुणे व पिंपरी-चिंचवडला काय सुरू अन् काय बंद?

संघटीत गुन्हेगारी संपविचा पोलिसांचा निर्धार- माळेगाव येथील जखमी रविराज यांच्यावर केलेल्या खुनी हल्ल्यातील आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर याआगोदर अनेक गंभीर गुन्हे तालुका पोलिस ठाण्यात दाखल आहेत. वास्तविक या गावात राजकिय सत्ता संघर्षातून सातत्याने संघटीत गुन्हे घडले आहेत. या पार्श्वभूमिवर गावातील संघटीत गुन्हेगारी संपुष्ठात आणण्याकामी खुद्द पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी संबंधित आरोपींवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार संबंधित गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

रविराज यांच्या प्रकृतीत सुधारणा- वैद्यकिय सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्या रविराज यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बारामती येथील भोईटे हाॅस्पिटलमध्ये हृदय रोग तंज्ञ डाॅ सुरज चव्हाण यांनी मंगळवारी पहाटेच्यावेळी रविराज यांच्या छातीवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली व गोळी छातीबाहेर काढली. डाॅ. पुरंदरे यांचेही या वैद्यकिय उपचाराकामी सहकार्य़ लाभल्याचे सांगण्यात आले.

ncp
बारामती ते सासवड फिल्मी स्टाईलने पोलिसांकडून ट्रकचा पाठलाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com