पुणे : ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर तरुणावर धारदार शस्त्रांनी वार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

सहकानगर येथील ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर एका तरुणावर अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार केला. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून त्यास उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

पुणे : सहकानगर येथील ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर एका तरुणावर अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार केला. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून त्यास उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरज भगत असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. सहकानगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगरमधील ट्रेझरी पार्क येथे एका तरुणावर हल्ला झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भगत याच्या हातावर व गुडघ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे व तो जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्यास तत्काळ उपचारांसाठी ससून रूग्णालयामध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. 

भारताचा विकासदर राहणार एवढा; फिच रेटिंग्सचे अनुमान

दरम्यान, या घटनेनंतर स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. हा प्रकार कशामुळे झाला, किती जणांनी केला, याचा शोध सहकारनगर पोलिस घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on young man front of the Treasury Park Society in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: