esakal | पोलिसांचा खबरी असल्याचा संशय; मग पत्रकाराला...
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय; मग पत्रकाराला...

- धारदार शस्त्र हातात घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला.

पोलिसांचा खबरी असल्याचा संशय; मग पत्रकाराला...

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तसेच सातत्याने दारू संबंधित बातम्याप्रसिद्ध करत असल्याचा रोष मनात धरून बावडा (ता.इंदापूर) येथील पत्रकार गणेश कांबळे यांच्यावर धारदार शस्त्र हातात घेवून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. यासंदर्भात त्यांनी बावडा पोलिस दूरक्षेत्रमध्ये खबर दिल्यानंतर इंदापूर पोलिस ठाण्यात बावडा येथील सहाजणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर पोलिसांनी कोरोना संचारबंदीत बावडा व परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिस कारवाई केली होती. त्याच्या बातम्या पत्रकार गणेश कांबळे यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्या रोषातून गणेश हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तसेच अवैध दारूच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा रोष मनात ठेवून गणेश यास लक्ष्य करण्यात आले होते. त्यास सोशल मीडियावरून मारण्याची धमकी देण्यात आली.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

5 मेला रात्री 8:30 वाजता गणेश हा नरसिंहपूर चौकात शुभम लोंढे व राजरत्न कांबळे यांच्यासमवेत उभे असताना तेथे प्रथमेश उर्फ गोठ्या संतोष गरड, आर्यन उर्फ बबल्या समीनदर, विजय उर्फ दादा शरद भोसले तीन साथीदारांसह त धारदार शस्त्र घेऊन आले. मोठा पत्रकार झाला आहेस, दारूच्या बातम्या पोलिसांना देतो का, असे म्हणत शस्त्राचा धाक दाखवून गणेश यास शिवीगाळ, दमदाटी करण्यात येऊन त्यास लाथाबुक्यांनी त्याच्या मान, पाठ, पाय व पोटात जबर मारहाण करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गणेशचे मित्र भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले असता आता वाचला पण परत सापडला तर जिवंत सोडणार नाही, अशी त्यास धमकी देण्यात आली. या सर्व आरोपींविरुद्ध सात कायदा कलमांतर्गत इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

loading image
go to top