शटर तोडून एटीएममधील पैसे लंपास करायला आले अन्...

राजकुमार थोरात
Monday, 24 August 2020

बेलवाडी (ता. इंदापूर) येथे चोरट्यांनी गॅसकटरच्या साहय्याने एएटीएम सेंटरचे शटर तोडून एटीएममधील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या सर्तकतेमुळे फसला.

वालचंदनगर : बेलवाडी (ता. इंदापूर) येथे चोरट्यांनी गॅसकटरच्या साहय्याने एएटीएम सेंटरचे शटर तोडून एटीएममधील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या सर्तकतेमुळे फसला.

बेलवाडी गावामध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर आहे. रविवारी (ता.२३) रोजी रात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चाेरट्यांनी  गॅस कटरच्या साहय्याने  एमटीएम सेंटर शटर कापून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरु होता.यावेळी अचानक वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,पोलिस उपनिरीक्षक सदाशिव जगताप, पोलिस हवालदार सुरेश राक्षे, जगन्नाथ कळसाईत, सचिन गायकवाड, विजय शेंडकर  रात्रीची गस्त घालत असताना एटीएम तपासणी करण्यासाठी गेले होते.

पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा गॅस कटर व सिलेंडर जाग्यावर  ठेवून धूम ठोकली. पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे सापडले नाही. यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की,पोलिस ठाण्याच्या माध्यमातुन रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व एटीएम, बॅंका, सराफी दुकानदार, पेट्रोल पंपाची नियमित तपासणी सुरु असते. रविवारी रात्रपाळीची गस्त घालत असताना एटीएम जवळ जाताच चोरट्यांनी गाडी पाहून धुम ठोकली. घटनास्थळी गॅस सिलेंडर व कटर मिळाल असून, तो ही चोरट्याने जंक्शनमधील वर्कशॉपमधून चोरी केला आहे. चोरीचा प्रयत्न  करणारे चोरटे स्थानिक असण्याची शक्यता असून, लवकरच तपास लावणार असल्याचे सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An attempt at ATM theft was foiled due to the vigilance of Walchandnagar police