व्याजाच्या पैशातुन हवेत गोळीबार करून खूनाचा प्रयत्न

व्याजाचे पैसे व जागा नावावर करून घेण्याच्या कारणातून वृद्ध महिलेच्या मुलावर हवेत गोळीबार करीत खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उद्योजक पित्रा-पुत्रासह आठ जणांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Firing
FiringSakal

पुणे - व्याजाचे पैसे (Interest Money) व जागा नावावर करून घेण्याच्या कारणातून वृद्ध महिलेच्या मुलावर हवेत गोळीबार (Firing) करीत खूनाचा प्रयत्न (Murderer Attack) केल्याप्रकरणी उद्योजक पित्रा-पुत्रासह आठ जणांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. हि घटना डिसेंबर महिन्यात औंध येथे घडली होती. (Attempted Murder by Firing into the Air with Interest Money Crime)

याप्रकरणी पिंपळे सौदागरमधील काटेनगर येथील 62 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड (दोघेही रा.औंध) दिपक गवारे (रा.डेक्कन) राजू उर्फ अंकुश दादा , सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (सर्व रा. विधाते वस्ती) व अन्य दोन महिला अशा आठ जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न, महाराष्ट्र सावकारकी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत घटना डिसेंबर 2020 मध्ये घडलेली असली तरीही आरोपींच्या दहशतीमुळे वृद्ध महिलेने आत्तापर्यंत फिर्याद दिलेली नव्हती.

Firing
पुण्याहून कोल्हापूर-सांगलीकडे निघू नका; महामार्गावर आलंय पाणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाने आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यातून आरोपींनी फिर्यादींची रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील जागा स्वतःचे नावावर करून घेण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या मुलाला डिसेंबर 2020 मध्ये घरी बोलावले होते. त्यावेळी नानासाहेब गायकवाड याने त्याच्याकडील पिस्तूलाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर गणेश गायकवाड व दिपक गावारे याने फिर्यादींच्या मुलाच्या डोक्‍याला पिस्तूल लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने स्टॅम्प, लिहलेल्या व कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून डेक्कन येथील गवारे याच्या घरी कोंडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान गायकवाड पिता-पुत्रासह त्यांच्या इतर साथीदारांवर यापुर्वी देखील चतुःश्रृंगी, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com