जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना एक वर्षाचा कारावास.

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना एक वर्षाचा कारावास.

Published on

हल्ल्याप्रकरणी दोघांना
एक वर्ष कारावास

वडूज, ता. २४ ः जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना एक वर्षाचा कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाकीब बाबा शेख (वय २८, रा. मल्हार पेठ), विशाल संदीप भोसले (वय २८, रा. औंध) व बापूसाहेब तुकाराम सूर्यवंशी (वय ३६, रा. लांडेवाडी) या तिघांनी सचिन सूर्यवंशी (रा. लांडेवाडी) यांना लांडेवाडी येथे २६ डिसेंबर २०१७ रोजी कोयता व सळईने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. गुन्ह्याची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली होती. तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एल. जाधव, हवालदार डी. वाय. देवकुळे यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते. एकूण १६ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. जिल्हा सरकारी वकील व्ही. एच. काटकर व रघुनाथ खोत यांच्या वतीने साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. कागदोपत्री, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपींना दोषी ठरवून शाकीब बाबा शेख व विशाल संदीप भोसले या दोघांना एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. बापूसाहेब तुकाराम सूर्यवंशी याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत, हवालदार गणेश वाघमोडे याच्या मार्गदर्शनाखाली प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलिस हवालदार जयंवेत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, आमीर शिकलगार, सागर सजगणे यांनी सहकार्य केले.

-------------------------

00308
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com