पुणे - पर्वती येथील मुख्य वाहिनीची गळती रोखण्यासाठी जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, नवीन पर्वती, वारजे, एनएनडीसी जलशुद्धिकरण केंद्राच्या अंतर्गत येणार्या भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी (ता. १७) बंद असणार आहे.
त्यामुळे सर्व पेठा, कोथरूड, कर्नेनगर, चांदणी चौक, पॅनकार्ड क्लब, चतुःश्रृंगी, पाषाण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.