हडपसर : नाण्यांपासून बनवले आकर्षक शिवलिंग

२२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला
हडपसर : काळेपडळ येथील दीपक  घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग साकारले आहे.
हडपसर : काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग साकारले आहे.sakal
Updated on

हडपसर : काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविले आहे. २२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला असून गेल्यावर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातीलही अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा या तरूणाने केला आहे.

दीपक हा शिवभक्त आहे. तो दररोज नित्यनेमाने शिवमंदिरात दर्शनासाठी जात असतो. शिवलिंग प्रतिमा त्याला कायम मोहीत करते. आपण त्यामध्ये काहीतरी वेगळं करावे, या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनविण्याची संकल्पना सुचली. त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग आकारास आणले. गेली वर्षभरापासून परिसरात या शिवलिंगाची चर्चा सुरू आहे. अनेक नागरिक अवर्जुन ते पाहण्यासाठी घोलप यांच्या घरी जात आहेत.

हडपसर : काळेपडळ येथील दीपक  घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग साकारले आहे.
सामना पाक-वेस्ट इंडिजचा अन् मैदानाबाहेर उभे रवी शास्त्री!

दृष्टीक्षेपात शिवलिंग

एकूण नाणी : २२ हजार ३०१

दोन रुपयांची नाणी : १४ हजार ९१६

पाच रुपयांची नाणी : ४ हजार ८७५

दहा रुपयांची नाणी : २ हजार ५१०

एकूण रूपये : ७९ हजार ३०१

दीपक म्हणाला, "माझी मोबाईल शॉपी आहे. कामा व्यतिरिक्त मी इतर कोणताही छंद जोपासलेला नाही. मी शिवाचा भक्त असल्याने शिवलिंगाच्या दर्शनासाठी म्हणून दररोज शिवालयात जातो. जगात कुणीही संकल्पना राबवली नसेल, असे शिवलिंग बनविण्याचा माझा मानस होता. नाण्यांपासून अशी चांगली कलाकृती होईल, असा विचार करून चार महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग बनविता आले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com