अंकुश गोरे यांचा ठाम विकासाचा निर्धार, औंध गटाला नवी दिशा देण्याचा निर्णायक संकल्प
औंध गटाचा चेहरामोहरा
बदलणारच : अंकुश गोरे
प्रचार सांगतेनिमित्त व्यक्त केला निर्धार
औंध, ता. ५ : औंध जिल्हा परिषद गटातील निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, प्रचाराच्या सांगतेनिमित्त अंकुश गोरे यांनी गटातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधत विकासासाठी आक्रमक आणि परिणामकारक लढा देण्याचा निर्धार जाहीर केला. केवळ घोषणा नाही, तर ठोस कामगिरी दाखवून औंध गटाचा चेहरामोहरा बदलणारच, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
या गटातील भाजपच्या उमेदवार भारती गोरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी दिशा ठरवली जाणार असल्याचे सांगून श्री. गोरे म्हणाले, की निवडणुकीनंतर केवळ आश्वासनांचे राजकारण चालणार नाही. जनतेने दिलेला विश्वास ही आमची जबाबदारी असेल. प्रत्येक प्रश्नासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, प्रत्येक कामासाठी पाठपुरावा करेन आणि जनतेला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, भारती गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक, शेतकरी आणि दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र आणि प्रभावी योजना राबवण्यात येणार आहेत. पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत गरजांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सिद्धेश्वर कुरोली गणातील जनता शहाजी देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, औंध गणातील मतदार दादासाहेब इंगळे यांच्यावर ठाम विश्वास दाखवत आहेत, असेही श्री. गोरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सर्व समाजातील तरुण वर्ग मोठ्या जोमाने भारती गोरे यांच्या पाठीमागे उभा राहात असून, ही ताकदच आगामी विजयाचा कणा ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
.......................................
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे. एकही योजना कागदावर राहू देणार नाही. प्रत्येक आश्वासन प्रत्यक्षात उतरवले जाईल, याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. एकजुटीच्या बळावर औंध जिल्हा परिषद गट विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आदर्श ठरेल. हा गट यशाच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी मी पूर्ण करणारच. येथे नेता म्हणून नव्हे, तर भावासारखा उभा राहीन.
- अंकुश गोरे
..........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

