
औंध : बेंगळुरू-पुणे महामार्गावरील सेवा रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यात साचलेले पाणी यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे दर्जाहीन पावसाळापूर्व रस्ते दुरुस्तीची पोलखोल झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.