Pune News : औंधमध्ये चार दिवसांपासून सांडपाणी वाहतंय, नागरिक त्रस्त
Aundh Sewage Issue : औंध येथील पोलिस कार्यशाळेसमोर चेंबर तुंबल्यामुळे चार दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
औंध : येथील पोलिस वाहन कार्यशाळेसमोर गेल्या चार दिवसांपासून चेंबर तुंबून सांडपाणी ओसंडून वाहत आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली.