Aundh Traffic : औंधमधील कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करणार : मनोज पाटील

Pune City Updates : औंधमधील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंग समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ‘औंध पॅटर्न’ राबविण्यात येणार असून, ‘पीटीपी’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.
Aundh Traffic
Aundh TrafficSakal
Updated on

औंध : ‘‘औंध परिसरात वाहतुकीचा भार प्रचंड वाढत आहे. मेडीपॉईंट चौकात सिग्नल आवश्यक असून सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर झाला पाहिजे. नागरिकांनी ‘पीटीपी’ ॲपच्या माध्यमातून दुहेरी पार्किंग व अतिक्रमणांचे फोटो पाठवावेत, या माध्यमातून संबंधितांवर कारवाई केली जाईल,’’ असे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. ‘औंधसाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबवून ‘औंध पॅटर्न’ तयार करून महिन्यात आढावा घेऊ. त्यासाठी पोलिस व वॉर्डनची संख्या वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com