लॉकडाऊनच्या काळात 'त्यांनी' केली अशी मदत तेही विनामोबदला!

जनार्दन दांडगे 
रविवार, 31 मे 2020

-  रिक्षाचालकाने लॉकडाऊनच्या काळात केली मदत.

उरुळी कांचन : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना मदत व्हावी, या उद्देशाने शहरापासून ते थेट खेडेगावातील गल्लीबोळापर्यंत कोणी किराना मालाचे किट वाटले, कोणी कपडे वाटली तर कोणी सॅनिटायझर. मात्र, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रिक्षाचालकाने लॉकडाऊनच्या काळात उरुळी कांचन व परिसरातील अपंग, दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना दवाखाना, बँक, किराना माल भरणे, सिलिंडर आणणे, अशा विविध कामासाठी विनामोबदला घरपोच तीन-चाकी रिक्षांची सेवा पुरवून सेवेचा नवाच अध्याय रचला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पप्पू उर्फ विपुल मोहन घोडके (वय- ३६) हे त्या अवलिया रिक्षाचालकाचे नाव असून, तो उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत तुपे वस्ती येथे राहतो. विपुल घोडके या रिक्षाचालकाने मागील अडीच महिन्याच्या लॉकडाऊन काळात उरुळी कांचन व परिसरातीस दीडशेहून अपंग, दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना बॅंकेत, दवाखान्यात ने-आण करणे, किराना माल घरपोच करणे, गॅस एजन्सीमधून सिलंडर आणून देणे, अशी विविध कामे ती विनामोबदला केली आहेत. मात्र, हे करताना सोशल मीडियात एकही फोटो अथवा कमेंट येऊ दिली नाही हे विशेष. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उरळी कांचन येथील विपुल उर्फ पप्पू घोडके तीन-चाकी रिक्षा चालवतो तर वडील आणि विपुलचा एक भाऊ रिक्षा व एका चारचाकी गाडीच्या साह्याने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संसर्गाच्या महामारीने रौद्ररूप धारण केल्यावर अडीच महिन्यांपूर्वी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या झटक्यामुळे इतर मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाने विपुल व त्याच्या कुटुबांलाही जगण्याची भ्रांत निर्माण झाली होती. मात्र, विपुलने आपल्या कुटुंबाची जगण्याची भ्रांत बाजूला ठेवून जनसेवेचा वसा जो मनात घर करून होता, त्याला वाट मोकळी करून देण्याच्या भावनेतून एक विचार केला आणि आपल्या हाती असलेल्या रिक्षा या तीन-चाकी  वाहनाच्या माध्यमातून उरुळी कांचन व परिसरातील दिव्यांग, अपंग व ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला व विपुल याने अमलातही आणला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विपुल याने मागील अडीच महिन्याच्या काळात उरुळी कांचन व परिसरातील अपंग,  दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राहत्या घरातून दवाखान्यात अथवा मेडिकलमध्ये नेणे-आणणे, बँकेत घेऊन जाणे, किराणा सामान खरेदी करण्यासाठी वा गॅस सिलेंडर आणण्यासाठी घरपोच सेवा देणे अशी कामे केली आहेत. विपुलने आपला मोबाईल नंबर (मो. नं. ८६००६०५४१२) हा ग्रामपंचायत कार्यालय, पोलिस चौकी आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या अक्षरात लिहून ठेवला आहे. मोबाईल फोनवर मदतीचा फोन येताच, विपुल तात्काळ फोन करणाऱ्याच्या घरी जाऊन मदतीचा हात पुढे करतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत बोलताना विपुल घोडके म्हणाले, लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून समाजातील सर्व स्तरातील नागरीकांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असल्याचे दिसून आले. मात्र, अपंग, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वेगळ्या असल्याने, त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचे दिसुन आले. 

यातून आपल्या तीन-चाकी रिक्षातून वरील लोकांना मदतीचा हात पुढे करायचा हा निर्णय घेतला. मागील अडीच महिन्याच्या काळात अपंग,  दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी फोन केला आणी मी मदतीसाठी गेलो नाही, असे झालेच नाही. मागील अडीच महिण्याच्या काळात दिडशेहुन अधिक जनांना मदत केली असुन, यापुढील काळातही मदत करतच राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Drivers provided Free Services During Lockdown Urali Kanchan Pune