Video :..म्हणून पुण्यातील रिक्षाचालकांनी रिक्षा काढल्यात विकायला

सागर आव्हाड
शुक्रवार, 22 मे 2020

- गेल्या दोन महिन्यांपासून रिक्षाचे चाक एकाच ठिकाणी थांबले

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले असले तरी रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. लॉकडाऊन किती दिवस असेल माहित नाही. म्हणून पुण्यात रिक्षाचालकांनी रिक्षा विकायला काढल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन महिन्यांपासून रिक्षाचे चाक एकाच ठिकाणी थांबले आहे. पुण्यात अनेक कुटुंब असे आहे, ज्यांचे व्यवसाय फक्त रिक्षा चालवणे हे आहे. कुटुंब मोठा व घरात करता धरता फक्त एक असल्याने या लॉकडाऊनमध्ये अशा कुटुंबाचे दोन वेळच्या जेवणाचेही खूप हाल होत आहे. स्वतः जेवायचं की मुलांना जेवायला द्यायचं हा प्रश्न बहुतेक रिक्षाचालकांचा झाला आहे. जेवढं कमवलं तेवढं सगळं संपलं. आता मदत मागायची तरी कोणाकडे आणि किती वेळा म्हणून पुण्यातील अप्पर येथील शिवनेरी रिक्षा संघटना येथील रिक्षाचालकांनी रिक्षा विकायचे आहे, असे फलक लावले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनमध्ये जेवढं होतं ते सगळं आम्ही आमच्या संघटनेतर्फे मदत केली. पण आम्हालाही काही मर्यादा आहे म्हणून आम्ही देखील आत्ता काही करू शकत नाही. सरकारने मदत करायला हवं अशी आशा शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर यांनी व्यक्त केली. या रिक्षा संघटनेतील सुनीता गोरे, पूनम गायकवाड, विमल थोरात, शारदा भोईने या महिलांना आपल्या मुलंबाळांसह रिक्षा विकणे आहे, असे फलक हातात घेऊन आपली व्यथा व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या रिक्षावर दोन कुटुंब चालतात. सुरवातीला जेवढं होतं तेवढं आत्ता संपलं. आत्ता मदत ही कोण करणार म्हणून आत्ता रिक्षा विकणे हाच एकमेव उपाय राहिला आहे, असे सुनीता गोरे यांनी दिली.

रिक्षामुळे कुटुंब सुरळीत चाललं होतं. वाटलं न्हवतं अशी वेळ कधी आमच्यावर येईल. आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत आलो पण या संकटाने विचार करायला भाग पाडले की आत्ता काय अशी माहिती रिक्षाचालक पूनम गायकवाड यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात मोठ्या प्रमाणत रिक्षाचालक आहे.अनेकांचे फक्त रिक्षावर कुटुंब असल्याने या लॉकडाऊनमुळे या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली असली तरी त्यानांही मर्यादा आहे. पुण्यात असं चित्र कधी पाहायला मिळेल अस कोणीच विचार केलं नसेल पण कोरोनाने हेही चित्र दाखवले. आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना रिक्षाचालकांच्या डोळयांत अश्रू दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Drivers is in Tension due to Lock Down