ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशन चाचणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ | Pune news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

auto riksha

ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशन चाचणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे : ऑटोरिक्षांची संख्या लक्षात घेऊन ऑटोरिक्षा परवानाधारक आणि चालकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशन चाचणी करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा: केंद्राने थकविला गोसेखुर्दचा निधी; २५१ कोटी जाहीर करून दिले फक्त ९६ कोटी

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेतर्फे मीटर तपासणीसाठी अलंकार पोलिस ठाण्यासमोर कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट इगलबर्ग कंपनी लेन क्रमांक ३, दिवे (पासिंग वाहने) आणि इयॉन आयटी पार्कजवळ खराडी पोलिस चौकीसमोर ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रिक्षाचालकांनी मीटर कॅलिब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी वरीलपैकी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात.

हेही वाचा: विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात : केंद्राने थकविला निधी; शिष्यवृत्तीचे दिले नाही अकराशे कोटी

विहित मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबित(suspend) करण्यात येईल. निलंबन कालावधी किमान ७ दिवस तर कमाल ४० दिवस राहील. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क भरण्याची तयारी असल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपयांप्रमाणे किमान पाचशे रुपये तर, कमाल दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही असे तडजोड शुल्क भरावे लागेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी(RTO) यांनी दिली.

Web Title: Autorickshaw Meter Calibration Test Extended Till 28th February

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsrtoauto rikshaw
go to top