अवंतिकाची राज्याच्या संघात निवड

अवंतिकाची राज्याच्या संघात निवड
Published on

RHF26B11193
राहुरी : बॉल बॅडमिंटन खेळाडू अवंतिका गाडे हिचा सत्कार करताना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे, समवेत गणेश गाडे, प्राचार्य डॉ. नवनाथ दळवी आदी.

राज्य बॉल बॅडमिंटन संघात
अवंतिका गाडे हिची निवड
राहुरी, ता. २२ : राहुरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अवंतिका गणेश गाडे हिची राष्ट्रीय महिला बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्याच्या संघात निवड झाली. त्याबद्दल तिचा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अवंतिका हिने श्रीरामपूर येथे १८ ते २० दरम्यान आयोजित राज्य स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन व अहिल्यानगर हौशी बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्यातर्फे ही स्पर्धा पार पडली. अवंतिका ही डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश गाडे यांची कन्या आहे. तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली, अशी माहिती हौशी बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव नितीन घोलप यांनी दिली.
महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोष बर्डे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या निवडीबद्दल कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, प्राचार्य डॉ. नवनाथ दळवी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com