

No relatives came forward, but humanity did.
Sakal
मंचर : आयुष्याची ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अखेर अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीने माणुसकीच्या नात्याने त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारत सन्मानाने अखेरचा निरोप दिला. त्यानंतर हिंदू धर्मशास्त्रानुसार दशक्रियाविधीही करण्यात आला.