Avinash Bhosale CBI | बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले CBIच्या तडाख्यात; घरासह मालमत्तेवर छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

businessman Avinash Bhosale
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले CBIच्या तडाख्यात

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले CBIच्या तडाख्यात; घरासह मालमत्तेवर छापे

मुंबई आणि पुण्यात सध्या सीबीआयची छापेमारी सुरू असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचं घर आणि काही मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. भोसले यांच्यासह विनोद गोएंका आणि शाहीद बालवा यांच्यावरही कारवाई झाली आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई झाली असून मुंबई आणि पुण्यात आठ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. याच प्रकरणात संजय छाब्रिया यांनाही अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यावसायिक आहेत. तसंच ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरेही आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही आहे.

Web Title: Avinash Bhosale Ed Seized His Property Gain Sanjay Chhabriya Money Laundering

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CBICBI inquiry
go to top