खुटबाव/ वरवंड - हिंगणीगाडा (ता. दौंड) येथील २१ वर्षीय युवक अविनाश संभाजी खराडे याचा शनिवार दिनांक २ रोजी वरवंड येथे रात्रीच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये अविनाश यांच्या मेंदूला व फुफुसाला जबर मार लागला..दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मदतीने खराडे यांना डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अथक प्रयत्न केल्यानंतर उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने खराडे यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर दुःख बाजूला करत खराडे परिवाराने अविनाशच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर खराडे यांच्या शरीरातील यकृत, दोन मूत्रपिंड, फुफ्फुस व हृदय या अवयवांचे चार रुग्णांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे.या निर्णयामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले आहे. दौंड तालुक्यामध्ये अवयवदानाचा हा पहिलाच प्रयोग आहे..याबाबत सविस्तर हकीगत अशी की, शनिवार दि. ३ रोजी आपल्या दुचाकीवर मृत अविनाश खराडे यांच्यासोबत रात्रीच्या वेळी चुलत बंधू आदित्य खराडे वरवंड वरून हिंगणीगाडा येथील घरी चालले होते. वरवंड येथे अंधारात उभ्या असणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने आदित्य खराडे (वय-२३, राहणार हिंगणीगाडा, ता. दौंड) यांचा सर्वप्रथम उपचारादरम्यान मृत्यू झाला..सोबत असलेले गंभीर जखमी अविनाश खराडे यांना पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान खराडे यांचा ब्रेन डेड झाल्याचे डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पीटलचे कन्सलटिंग न्यूरो सर्जन डॉ आर. डी. देशमुख यांनी घोषित केले.त्यानंतर अविनाश याचे अवयवदान करण्यात यावे असा मतप्रवाह पुढे आला.आमदार राहुल कुल, दौंड येथील डॉ. सुभाष पानसरे, माजी उपसभापती साहेबराव वाबळे यांनी अविनाश याचे अवयवदान करण्यासंदर्भात खराडे परिवाराशी चर्चा केली. चर्चेअंती अविनाश यांचे वडील संभाजी खराडे, संदीप खराडे, अभिजीत खराडे, भैय्या खराडे, स्वप्निल खराडे यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला..त्यानंतर डी. वाय .पाटील रुग्णालयाचे फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे डॉ. राहुल केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर अविनाश यांच्या शरीरातील अवयव यशस्वीरित्या काढण्यात आले.या दरम्यान प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक डॉ. आरती गोखले यांनी समन्वयाची भूमिका बजावली. त्यानंतर अविनाश यांचे यकृत रुबी हॉलमध्ये, फुप्फुस डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये, एक मूत्रपिंड दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये, हृदय व एक मूत्रपिंड सह्याद्री हॉस्पिटलमध्ये देण्यात आले..या नामांकित चार हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवरती या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. अवयव दान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवार दि. ५ रोजी रात्री ११ वाजता खराडे यांच्यावर हिंगणीगाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.राहुल कुल (आमदार)कुटुंबातील व्यक्त केल्याचे दुःख बाजूला करत, खराडे परिवाराने अवयव दानाचा धाडसी निर्णय घेतला आहे. जग सोडताना चार जणांना जीवदान देणे यासारखे पवित्र कर्तव्य नाही. अधिवेशनात अवयवदान प्रक्रिया सुलभ करण्यात यावी यासंदर्भात मी मागणी मांडली होती. अविनाशच्या मृत्यूचे दुःख असताना खराडे परिवाराने हे पवित्र कार्य केले. दुःखाच्या प्रसंगीही खराडे परिवाराने घेतलेला निर्णय आदर्शवत आहे..डॉ. सुभाष पानसरे (दौंड)जगामध्ये काही ठिकाणी अवयवदान केल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. महाराष्ट्रामध्ये अवयव दान चळवळीवरती काम करणे गरजेचे आहे. गेले दोन दिवस मी या परिवारासोबत आहे. खराडे परिवाराने घेतलेल्या निर्णयाला माझा सलाम!संभाजी खराडे (अविनाशचे वडील)आज अविनाश आमच्यामध्ये नाही. अविनाशमुळे चार जणांना जीवदान मिळाले. त्या चार जणांमध्ये अविनाशला आम्ही पाहतो. अविनाशच्या स्मृती जपण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवणार आहे. या कठीण प्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केलेली मदत सर्वात मोलाची आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.