

खुल्या गटात अविरत चौहान विजेता
डॉ. हेडगेवार स्मृती बुद्धिबळ स्पर्धा
पुणे, ता. ८ ः क्रीडा भारती, पुणे महानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अकराव्या डॉ. हेडगेवार स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत अविरत चौहानने साडेसहा गुणांसह विजेतेपद मिळविले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून बीएमसीसी कॉलेजच्या टाटा हॉलमध्ये संपलेल्या या स्पर्धेत पहिल्या पटावर अविरत चौहानने यश वाटारकरला बरोबरीत रोखताना साडेसहा गुणांसह प्रथम स्थान मिळविले. मिहीर सरवदे, यश वाटारकर, राघव पावडे, श्रीरंग बोंदालेने प्रत्येकी सहा गुणांसह दोन ते पाच क्रमांकात यश मिळविले. अंश नायर व आरुष बुदजादेने प्रत्येकी साडेपाच गुणासह सहावा व सातवा क्रमांक तर सौरभ परमार, राकेश मथीयाजगन व श्रीकांत भोसलेने प्रत्येकी पाच गुणांसह आठ ते दहा क्रमांकात यश मिळविले.
निकाल असे ः
खुला गट : सातवी व अखेरची फेरी
यश वाटारकर (६ गुण) बरोबरी विरुद्ध अविरत चौहान (६.५ गुण); मिहीर सरवदे (६ गुण) वि.वि. अंश नायर (५.५ गुण); आरुष बुदजादे (५.५ गुण) बरोबरी विरुद्ध प्रीतिका नंदी (५.५ गुण); सौरभ परमार (५ गुण) पराभूत विरुद्ध राघव पावडे (६ गुण); श्रीरंग बोंदाले (६ गुण) वि.वि. गणेश अंताड (५ गुण); चंद्रकांत डोंगरे (५.५ गुण) वि.वि. उदय मुद्रा (४.५ गुण); एस अद्वैय वैथीस्वरण (४.५ गुण) पराभूत विरुद्ध श्रीकांत भोसले (५ गुण); मृण्मयी बागवे (४ गुण) पराभूत विरुद्ध राकेश मथीयाजगन (५ गुण); आर्यन अरु (४.५ गुण) बरोबरी विरुद्ध रंजन राजीव (४.५ गुण); ऋषिकेश साळी (५ गुण) वि.वि. प्रदीप कुलकर्णी (४ गुण); अर्णव पाटील (५ गुण) वि.वि. अभिजय वाळवेकर (४ गुण); अमोल ढमाळे (५ गुण) वि.वि. ओमकार पुरंदरे (४ गुण); श्रेयस पाटील (५ गुण) वि.वि. ओजस नेवपूरकर (४ गुण); शुभम राहींज (५ गुण) वि.वि. अक्षज पाटील (४ गुण); उदयसिंह पाटील (५ गुण) वि.वि. लाव्या अग्रवाल (४ गुण).
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.